मराठा आरक्षणासाठी लढणारा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा एक अनोखा अंदाज आज समोर आला असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सभा गाजवणारा व सरकारवर जोरदार फटकेबाजी करत सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील क्रिकेटच्या मैदानावर खेळताना जोरात बॉलिंग व बॅटिंग करतांना दिसले, मनोज जरांगे हे आंतरवालीच्या तरुणांसोबत क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतांना दिसत आहे. त्यांच्या या खेडाडू वृत्तीतून एक नवा अंदाज दिसून आला आहे.
१४ ऑक्टोबर रोजी जालन्यातील आंतरवाली सराटीमधील ज्या मैदानावर मनोज जरांगे यांनी ऐतिहासिक सभा घेतली होती.त्याच मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सकाळी फिरण्यासाठी निघालेले असताना काही तरुण क्रिकेट खेळात असल्याचे जरांगे यांनी पाहिले. यानंतर जरांगे यांनाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी त्यांनी चौकार, षटकार मारत गोलंदाजी करत क्रिकेटचे मैदानही गाजवल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान कालच बीड येथे जरांगेंची लाखोंच्या उपस्थिती मध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा देखील सांगितली असून २० जानेवारीपासून मुंबईमध्ये उपोषण करणार असून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.२४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन न पाळणाऱ्या सरकारविरोधात मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला आहे.