पाचोरा,(प्रतिनिधी)- पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातील पाचोरा – जामनेर रस्त्यासाठी १४८ कोटी तर कजगाव शिंदी रस्त्यासाठी 140 कोटी असे एकूण २८८ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती कार्यसम्राट आमदार किशोरअप्पा पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
जळगाव चौफुली ते पहुर जवळील मालखेडा पर्यंत रस्त्याची एडीपीच्या माध्यमातून 148 कोटी तर दाताचा रस्ता तसेच कजगाव गोंडगाव कोळगाव शिंदे पर्यंतच्या रस्त्या करिता 140 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. पाचोरा व भडगाव तालुक्यातील भातखंडे गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलासाठी पंधरा कोटीचा निधी मिळाल्याची माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शहरप्रमुख किशोर बारवकर, नसीर बागवान, सुनील पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे आधी उपस्थित होते
पाचोरा तालुक्यातील शंभर किलोमीटर 58 किलोमीटरचे शेत रस्ते मातोश्री पाणंदमधून मंजूर केले आहेत मात्र एकही शेतरस्तयाचे काम सुरू झाले नसल्याने लवकरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले. मतदार संघातील 50 गावांच्या विकास कामासाठी साडेसात कोटी प्राप्त झाल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.
काकनबडीॅचा यात्रोत्सव सोमवारी आहे यात्रेनिमित्ताने काकणबर्डी परिसराच्या विकासासाठी १७ कोटीच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार होता. मात्र आता यात्रेनंतर लवकरच एक कार्यक्रम आयोजित करून काकणबडीॅत विविध कामांचा शुभारंभ करणार असल्याचे त्यांनी सांगितले