जळगाव,(प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडी (VBA) चे सर्वेसर्वा ॲड.बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांची जळगाव येथे आज दिनांक १८ रोजी भव्य जाहीर ‘ सत्ता संपादन सभा’ होतं असून राज्यभरात प्रकाश आंबेडकरांच्या सभेला लाखोंच्या संख्येत होत असलेली प्रचंड गर्दी आणि वाढता प्रतिसाद लक्षात ते जळगाव मध्ये काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
या ठिकाणी होणार सभा….
जळगाव शहरातील महाबळ रोड,संत गाडगेबाबा चौक, पठाण बाबा टेकडी,जळगाव येथे दिनांक १८ सोमवार रोजी ठीक ४ :०० वाजता होणार आहे. दरम्यान सभेला मोठी उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.तरी सभेला उपस्थित राहण्यासाठी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवक जिल्हाध्यक्ष जितू केदार यांनी कळविले आहे.
इंडिया’ आघाडीत वंचित बहुजन आघाडी सामील होणार का?
१९ डिसेंबर २०२३ रोजी दिल्ली येथे ‘इंडिया’ (india)आघाडीचा भाग असणार आहे की नाही? यावरही अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. वंचितला इंडिया आघाडीत घेण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) इतर घटक पक्षांशी बोलणार आहेत, याबाबतची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले उद्धव ठाकरें सोबत झालेल्या बैठकीत इंडिया आघाडी बाबत बोलणं झालं असून पुढील बैठकीत वंचित ‘इंडिया आघाडीमध्ये ‘आहे की नाही? याचा अंतिम निर्णय ते घेतील. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक झाली की त्यामध्ये वंचितबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही दोघांनी काहीही निर्णय घ्यायचा नाही, असं ठरवलं आहे. त्यामुळे आता मी काहीही उत्तर देऊ शकत नाही,” अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना दिली.