मुंबई,(प्रतिनिधी)- मुंबई महानगरपालिकेच्या(mumbai Municipal Corporation (BMC) मागील २५ वर्षाच्या कामाचे ऑडिट केले जाणार आहे.यासाठी सरकारकडून त्रीसदस्य समिती गठीत करणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली असून समितीमध्ये नियोजन, नगरविकास विभागाचे सचिव यांचा समावेश असणार आहे.mumbai Municipal Corporation (BMC) Latest News
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेनेची २५ वर्ष सत्ता असलेल्या mumbai Municipal Corporation (BMC) चे ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली होती. मागील २५ वर्षात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप BJP कडून सातत्याने करण्यात येत आहे. दरम्यान भाजपा MLA Yogesh Sonar यांनी पुरवणी मागणीवर बोलताना मागणी केली होती. त्यानंतर ही माहिती देण्यात आली असून पुढील अधिवेशनात या संदर्भातील अहवाल सादर केला जाणार आहे.
mumbai Municipal Corporation (BMC) मधील ८ नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यानच्या झालेल्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून करण्यात आली होती. या सगळ्या अहवालामध्ये पारदर्शकतेचा अभाव, निधीचा निष्काळजीपणे वापर आणि ढिसाळ नियोजन असे ताशेरे कॅगने आपल्या अहवालात mumbai Municipal Corporation (BMC) च्या एकूण कारभारावर मारले होते.