Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर येथे ४ रोजी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मनोज जरांगे पाटील यांची भव्य रॅली

najarkaid by najarkaid
December 1, 2023
in जळगाव
0
जामनेर येथे ४ रोजी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मनोज जरांगे पाटील यांची भव्य रॅली
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(विशेष प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणार्थ संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरण करून आरक्षणाला मराठा समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी जनजागरण करत असलेले समाजाचे तरूण तडफदार नेते मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. याचाच एक भाग म्हणून जळगाव येथे तीन डिसेंबर रविवारी त्यांची सायंकाळी सभा सभा होणार असून दिनांक चार रोजी ते जामनेर मार्गे भुसावळ ,मुक्ताईनगर असा रोड शो आणि रॅली काढणार आहेत.

जामनेर येथे मनोज जरांगे पाटील यांची भव्य दिव्य रॅली होणार असून सकाळी दहा वाजता जामनेर शहरात त्यांचे आगमन होईल. जामनेर तालुक्यातील नेरी, चिंचखेडे, केकत निंभोरा, पळासखेडे येथे त्यांच्या भव्य दिव्य स्वागताची तयारी करण्यात येणार आहे. तसेच जामनेर येथे सकाळी दहा वाजता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
जामनेर शहरातील आणि जामनेर तालुक्यातील सखल मराठा समाजाने या भव्य आणि दिव्य रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन मराठा आरक्षण कृती समितीने केले आहे.
जामनेर मधील त्यांचा रोड शो आणि भव्य रॅली आटोपल्यानंतर ते भुसावळ कडे प्रयाण करतील.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथून रणशिंग फुंकणारे समाज भूषण मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळेला उपोषण केले.

हे पण वाचा.….

गुन्ह्यात नसतांना FIR मध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय?

कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?

अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्‍याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

आपल्या मागणीच्या समर्थनार्थ ते संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करत आहे. या दौऱ्यात ते उत्तर महाराष्ट्रातून विदर्भात प्रवेश करणार आहेत.मनोज जरांगे पाटील यांचे जामनेर शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वागत करण्यात येणार आहे.
या रॅली आणि रोड शो मध्ये मराठा समाजातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज जामनेर शहर आणि जामनेर तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठा समाजाचे आरक्षण हे अंतिम टप्प्यात आले असून 24 डिसेंबर ही अंतिम तारीख महाराष्ट्र सरकारला देण्यात आली आहे. यासाठीच श्री मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रात समाज बांधवांना आपली भूमिका समजावून सांगत आहे.
मराठा समाजाने त्यांना अगोदरच पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा दिला असून कोणत्याही ओबीसी जमातीवर अन्याय होणार नाही हा संदेश ते संपूर्ण राज्यात पोहोचवण्यासाठी आपला दौरा करत आहे.

याचाच एक भाग म्हणून ते सोमवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता जामनेर शहरात येणार आहेत.
जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाज असून या कार्यक्रमाला समाजातील सर्व धुरंधर व्यक्तींनी आणि हितचिंतकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्यांच्या स्वागतासाठी जळगाव रोड वरील पळासखेडे येथून भव्य दिव्य मोटार सायकल रॅली द्वारा स्वागत करण्यात येणार असून जामनेर तालुक्याच्या वतीने भुसावळ रोडवरील गारखेडे येथे निरोप देण्यात येईल.
सकल मराठा समाज बांधवांनी आणि तरुणांनी या कार्यक्रमासाठी मोटारसायकलीने उपस्थित रहावे आणि मोटार सायकल रॅली त्यांचे स्वागत आणि निरोप द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव ; राष्ट्रीय लोक अदालतीचे ९ डिसेंबर रोजी आयोजन

Next Post

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता ; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
आणखी ३ दिवस राज्यात पाऊस ; ‘या’ १४ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता ; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us