जळगाव – जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालयामार्फत दरवर्षी 12 ते 18 डिसेंबर दरम्यान क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार याही वर्षी क्रीडा कार्यालय व जिल्ह्यातील विविध शाळांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनामार्फत (Fit India Movement) कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले असून त्यानुसार 12 ते 18 डिसेंबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करून क्रीडा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. तसेच क्रीडा सप्ताह अंतर्गत गो-गर्ल गो ही मोहिम 6 ते 14 वयोगटातील मुलींकरिता राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये क्रीडा सप्ताह अंतर्गत fit india movement व क्रीडा सप्ताहाचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. खेलो इंडिया या उपक्रमांतर्गत 5 ते 8 वयोगट व 9 ते 18 वयोगटातील मुलांकरिता शारिरीक क्षमता मुल्यमापन चाचण्या घेण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी, महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी व सर्व गट शिक्षणाधिकारी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील व तालुक्यातील समन्वयक व केंद्र प्रमुख यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.