चोपडा,(प्रतिनिधी)- व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीने तरुणाकडून लाखो रुपये उकळले असल्याची घटना उघडकीस आली असून हनी ट्रॅप मध्ये अडकलेल्या तरुणाने अखेर या प्रकरणी अडावद पोलिसांत तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तरुणाचे एका तरुणीने नग्न व्हिडिओ बनवून ते सार्वजनिक करत व्हायरल करण्याची धमकी दिली.व्हिडीओ व्हायरल होईल व बदनामी होईल या भीतीपोटी तरुणीने तरुणाकडून वेळोवेळी पैशांची मागणी करत त्याच्याकडून तब्बल चार लाख रुपये उकळले.
याबाबत अधिकची माहिती अशी की, चोपडा तालुक्यामधील एका तरुण शेतकरी हा आपल्या शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तो गावी असताना २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या काळात एका २७ वर्षे तरुणीने मोबाईलवरून फोन करून त्याच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध वाढविले. त्यानंतर व्हाट्सअप वर फोन करुन बोलणे सुरु ठेवले.
एका दिवशी तर या तरुणाला कपडे काढून नग्न होण्यास सांगितले. तरुणीच्या गोड बोलण्याला भुलून त्याने नग्न होताच त्या तरुणीने त्याचे व्हिडिओ बनविले. नंतर विडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विविध बँक खात्यातून त्याच्याकडून वेळोवेळी ४ लाख ९ हजार ५०० रुपये मागून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणाने अडावद पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. तपास पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर करीत आहेत.