भुसावळ : भुसावळ मार्गे धावणाऱ्या पुणे-हाटिया-पुणे या रेल्वे गाडयांच्या १० अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे घेतला आहे. सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेवून विशेष रेल्वे गाडया चालविण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.
०२८४५ साप्ताहिक उत्सव विशेष रेल्वेगाडी पुणे येथून दर शुक्रवारी १ डिसेंबर दरम्यान सकाळी १०.४५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.२५ वाजता ती हटिया स्थानकावर पोहचेल. ०२८४६ साप्ताहिक उत्सव विशेष २९ नोव्हेंबर दरम्यान दर बुधवारी रात्री ९.३० वाजता हटिया येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २.४५ वाजता पुणे येथे पोहचेल. ही गाडी दौंड कार्डलाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राउरकेला या रेल्वेस्थानकावर थांबे घेणार आहे.
दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी पाहता हुतात्मा एक्स्प्रेस ही अमरावतीपर्यंत नेण्याचा मध्य रेल्वेने निर्णय घेतला आहे. ही गाडी आता पुणे- अमरावती हुतात्मा एक्स्प्रेस म्हणून असणार आहे.ही गाडी दौंड मार्गे वळवली असून ती आता दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरामार्गे अमरावती अशी धावणार आहे.