पाचोरा (किशोर रायसाकडा)- गेल्या सात दिवसापासून गट विकास अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने प्राथमिक शिक्षकांचा पगार करण्याचा विसर पडल्याने शिक्षक पगाराच्या प्रतीक्षेत आहे.
सविस्तर असे,माहे सप्टेंबर -2023 ची रक्कम जि.प. जळगाव यांचे कडून पं. स. पाचोरा यांना पाचोरा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पगाराची रक्कम दि.6 ऑक्टोबर शुक्रवार रोजीची येऊन पडली आहे. पण गटविकास अधिकारी सात दिवसापासून उपस्थित नसल्याने शिक्षकांचे अद्याप पगार झाले नाहीत. या मुळे शिक्षकांनी घेतलेल्या वैयक्तिक व गृहकर्जाचे हफ्ते बाउन्स होऊन सिबिल खराब होत आहे. ज़ि.प.जळगाव ने शिक्षकांचे पगार लवकर व्हावेत या साठी ZPPMS ही प्रणाली लागू केली. पण पाचोऱ्यात सात दिवसापासून चक्क गटविकास अधिकारी येत नसल्याने तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा पगार होऊ शकला नाही. या गटविकास अधिकारी बाबत तालुक्यातील प्राथमिक शिक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. या बाबत पाचोरा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गोष्टी कडे गांभीर्याने पाहावे. अशी शिक्षक वर्गकडून मागणी होत आहे.