जळगांव शहर महानगरपालिकेस विविध संवर्गातील पदे तात्पुरत्या स्वरूपात करारपध्दतीने एकूण ८६ पदे महिन्याच्या हंगामी कालावधीसाठी (१७९ दिवसांकरिता) निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरावयाची आहेत.सदरील पदभरती संदर्भात जाहिरात, अर्जाचा नमुना, पदांची संख्या, आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता, अनुभव, नियम, अटी व शर्ती इ. जळगांव शहर महानगरपालिकेच्या www.jeme.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
तरी विहित अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट देऊन जाहिरातीतील तपशील विचारात घेऊन विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह जळगाव शहर महानगरपालिका, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल टॉवर प्रशासकीय इमारत, आस्थापना विभाग १० वा मजला ‘अ’ विंग येथे विहीत मुदतीत समक्ष सादर करावेत.
तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीने भरावयाच्या पदांचा तपशील
क्र.१.कनिष्ठ अभियंता (बांधकाम),
पदांची संख्या – १०
अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil)
अभियांत्रिकी शाखेची पदवी.
ब) मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
एकत्रित मानधन – २२,०००/-
२. कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा)
अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechincal)
अभियांत्रिकी शाखेची पदवी.
ब) मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
एकत्रित मानधन – २२,०००/-
३) कनिष्ठ अभियंता (विदयुत )
अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
ब) मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
एकत्रित मानधन – २२,०००/-
४) रचना सहाय्यक
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुविषारद पदवी (B. Arch) किंवा स्थापत्य अभियांत्रिकी
(B.E.Civil/B.Tech. Civil) शाखेची पदवी.
ब) मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
एकत्रित मानधन – २२,०००/-
५) आरेखक
अ) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक कोर्स उत्तीर्ण आवश्यक. किंवा
अ) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे १ वर्षांचा NCVT कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
ब) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण | मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण.
एकत्रित मानधन – २१,०००/-
६) अग्निशमन फायरमन
अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण.
ब) राष्ट्रीय / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण
पाठ्यक्रम करणे आवश्यक.
क) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
एकत्रित मानधन – २१,०००/-
७) वीजतंत्री
अ ) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा वीजतंत्री कोर्स उत्तीर्ण आवश्यक. (लगतचे ३ वर्ष)
किंवा अ) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे १ वर्षाचा
NCVT कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
ब) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
एकत्रित मानधन – २१,०००/-
८) वायरमन
अ) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा तारतंत्री कोर्स
उत्तीर्ण आवश्यक. किंवा
अ) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे १ वर्षाचा | NCVT कोर्स उत्तीर्ण आवश्यक. ब) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
एकत्रित मानधन – २१,०००/-
९)आरोग्य निरीक्षक
अ) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्थेतून स्वच्छता निरीक्षक कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
ब) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण | मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.)उत्तीर्ण.
क) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
एकत्रित मानधन – २१,०००/-
१०)टायपिस्ट / संगणक चालक
अ) मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति | मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा
संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
ब) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण | मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.)उत्तीर्ण.
क) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
उपरोक्त पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्रांच्या सांक्षाकित केलेल्या छायांकितप्रतीसह ऑफलाईन पध्दतीने समक्ष सादर करावयाचे आहे. वयोमर्यादा:- किमान वयोमर्यादा :- सर्व प्रवर्गकमाल वयोमर्यादा :- खुला प्रवर्ग – ३८ वर्ष सर्व राखीव प्रवर्ग ४३वर्ष (इमाव, अ. ज., अ.जा., भज, विज, विमाप्र)- १८ वर्ष
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण
आस्थापना विभाग, प्रशासकीय इमारत १० वा मजला
| सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, महात्मा गांधी रोड,
| नेहरू चौक, जळगांव ४२५००१
अर्ज स्वीकारण्याची मुदत दिनांक ०३ / १० / २०२३ ते दिनांक २०/१०/२०२३
(सुट्टीचे दिवस वगळून)
वेळ :- सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत
टीप :- दिनांक २०/१०/२०२३ रोजी संध्याकाळी ५.३० नंतर कोणत्याही परिस्थितीत कुणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरती प्रक्रिया ऑफलाईन पध्दतीने असल्याने ई-मेलद्वारे प्राप्त अजांचा विचार केला जाणार नाही.