जळगाव,(प्रतिनिधी): शहरातील रस्त्यांवर झालेले खड्डयामुळे अनेकदा मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी विरुद्ध आंदोलन झाल्याचे पाहायला मिळाले असतांनाचं काहीच दिवसापूर्वी डागडुजी झालेल्या खड्डा पुन्हा जैसे थे झाल्याने तोच प्रश्न पुन्हा पुढे आला आहे. शहरातील खड्डयामुळे सामान्य नागरिक हैराण झाल्याने आता आ. बच्चू कडू यांच्या शिलेदारांनी ‘झोपेचे सोंग’ घेतलेल्या प्रशासनाला जाग आण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या खड्डयात झोपून ‘झोपा काढा’ आंदोलन करत ‘प्रहार’ केला आहे आता तरि प्रशासन झोपा काढणं बंद करून खड्डे दुरुस्त करतील का हा प्रश्न आहे.
अनोखे आंदोलन…
प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शनिवारी दुपारी १२ वाजता स्वातंत्र्य चौकात खड्डयात झोपून अनोखे आंदोलन करण्यात आले. संभाजी सोनवणे, दिनेश कोळी, प्रवीण पाटील, नीता राणे, जतिन पंड्या, विजय पाटील, नरेंद्र सपकाळे, रोहित कोठावदे, नितीन सूर्यवंशी, सतीश सपकाळे, दत्तू कोळी, मीना महाजन, अर्चना महाजन, कल्पेश सपकाळे, राज पाटील, माजिद अली आदींनी हे आंदोलन केले.यावेळी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधी यांच्याविषयी रोष व्यक्त करून घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनामुळे वाहतूक कोंडी
आंदोलनामुळे वाहतूक कोंडी तरुणांनी खड्ड्यात झोपून घेतल्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. जिल्हा पेठ पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले.