नवी दिल्ली : प्रसिद्ध किर्तनकार हभप इंदुरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टानं झटका दिला आहे. इंदुरीकर महाराजांवरील गुन्हा रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असून सत्र न्यायालयात खटला चालणार आहे
नेमकं काय आहे प्रकरण?
इंदुरीकर यांनी शिर्डीतील ओझर इथं एका किर्तनात पुत्रप्राप्तीबाबत कोणताही वैज्ञानिक आधार नसलेलं दिशाभूल करणार विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेण्यात आला होता. इंदुरीकरांनी केलेलं विधान हे गर्भलिंगनिदानाची जाहिरात केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. PCPNDTच्या सल्लागार समितीनं या विधानावरुन इंदुरीकरांना कारणेदाखवा नोटीस पाठवली होती.
यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रथम वर्ग न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पण सत्र न्यायालायनं इंदुरीकांवरील गुन्हा दाखल करण्याचा आदेश रद्द ठरलला होता. यानंतर सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात इंदुरीकरांविरोधात तीन वकिलांनी धाव घेतली होती. त्यानंतर हायकोर्टानं सत्र न्यायालायाचा आदेश रद्द केला होता.
त्यानंतर इंदोरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. इंदोरीकरांच्या अडचणीमध्ये वाढ झाली असून आता सत्र न्यायालयामध्ये आता परत खटला चालणार आहे.