Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेहरुण मधील काही भाग विकासापासून कोसो दूर

najarkaid by najarkaid
December 6, 2019
in जळगाव
0
मेहरुण मधील काही भाग विकासापासून कोसो दूर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – मेहरुण मधील काही परिसरांमध्ये नियमित स्वच्छता, गटारींची साफसफाई, चांगले रस्ते यामुळे विकास झालेला आहे. तर तांबापुरा,फुकटपुरा या भागांमध्ये अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी, रस्त्यांची दुर्दशा, पथदिवे अशा मुलभूत सुविधाही मिळत नसल्याने विकासापासून कोसो दूर असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. उघड्या विहिरींवर जाळी बसवावी, पाण्याची एकच वेळ ठरवून द्यावी, घरकुलांमध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्यांमुळे त्रास होत असून याठिकाणी महापालिकेने सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली.

प्रभाग क्र. 15 मेहरुण,मेहरुण गावठाण, तांबापुरा (उत्तर पूर्व भाग), फुकटफुरा, संत गुलाबबाबा कॉलनी हा परिसर येतो. या प्रभागात गुरुवारी जनशक्तिच्या टीमचे पाहणी केली. येथील नेमक्या समस्या व महापालिका, लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा काय याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या प्रभागामध्ये सर्व सामान्य नागरिक, मजूर, रोजंदारीवर काम करणार्‍या नागरिकांची संमिश्र वस्ती आहे. काही भागांमध्ये नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या दहा ते 15 दिवसांपासून नियमित स्वच्छता, गटारींची साफसफाई तसेच सार्वजनिक शौचालयांची साफसफाई होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

नगसेवक राहत असलेल्या भागातच स्वच्छता

महापालिकेचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन,जयश्री महाजन,प्रशांत नाईक,शबानाबी शेख यांचा हा प्रभाग आहे. चारही नगरसेवक शिवसेनेचे आहेत.नगरसेवक राहत असलेल्या भागात स्वच्छता, गटारींची साफसफाई तसेच रस्त्यांची साफसफाई होत असल्याचे दिसून आले. मात्र तांबापुरा यासह काही भागांमध्ये नाले, तसेच रस्ते व मोकळ्या जागांच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसून आले. असा विरोधाभास प्रभागामध्ये दिसून आला.

परिसरात फवारणी,धुरळणी नाहीच

या प्रभागातील काही परिसरामध्ये गटारींची गेल्या काही दिवसांपासून साफसफाई होत असल्याचे चित्र आहे. तर काही प्रभागांध्ये अद्यापही गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याने गटारी तुंबल्या आहेत. तर काही भागात गटारींची साफसफाई होते मात्र गटारीतील कचरा गटारीवर काढून ठेवला जातो. हा कचरा सफाई कामगार उचलत नसल्याने कचर्‍यामुळे डासांची उत्पत्ती होवून तसेच दुर्गंधी सुटून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच सार्वजनिक शौचालयांची व्यवस्थित स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधीमुळे नागरिक हैराण असल्याचे चित्र आहे. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर या प्रभागात महापालिकेकडून फवारणी,धुरळणी केली जात नसल्याचे नागरिकांनी मनपा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येणार का असाही प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला.

विहिरीला कठडा व जाळी नसल्याने दुर्घटना होण्याची शक्यता

मेहरुण परिसरातील जोशी पेठ परिसरात विहिर आहे. या विहिरीवर नागरिक दोराच्या सहाय्याने पाणी भरत असतात. या विहिरीला कठडे नाहीत, तसेच जाळी नाही. त्यामुळे परिसरात खेळणारे बालक, विहिरीत पडण्याची शक्यता आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिकेने या विहिरीला कठडा तयार करुन जाळी बसवावी अशी मागणी येथील महिलांनी केली. तसेच नियोजित पाणीपुरवठा असला तरी वेळ मात्र अनियमित आहे. पाण्याच्या वेळा ठरवून द्याव्यात व त्यानुसार महापालिकेने निर्धारित वेळेतच पाणी पुरवठा करावा अशीही अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावचे नाव उंचावले; शशांक अत्तरदे खेळणार रणजी

Next Post

जळगाव शहरातील 100 कोटींच्या कामांना ब्रेक

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
जळगाव शहरातील 100 कोटींच्या कामांना ब्रेक

जळगाव शहरातील 100 कोटींच्या कामांना ब्रेक

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us