जळगाव – ईव्हीएम मध्ये होत असलेल्या घोळामुळे देशभरात विविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएमविरोधात आवाज उठवला जात आहे. ईव्हीएम हटवण्याच्या मागणीवरून आज 17 जून 2019 रोजी, जळगाव येथे वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद, व निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी “ईव्हीएम हटाव, देश बचाव’, ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव ‘ अशी घोषणाबाजी करण्यात आली. येत्या काळात निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते मा. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब, प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत (आबु)भालेराव, यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलन करते वेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुजाता ठाकूर, महिला महानगर अध्यक्ष कवीता सपकाळे, रेखाताई शिरसाठ युवक महानगर अध्यक्ष जितेंद्र केदार, युवक जिल्हा महासचिव अनुप पानपाटील, जिल्हा उपाध्यक्ष डिगंबर सोनवणे, खंडू महाले, गौतम सोनवणे, शांताराम अहिरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.