मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. ती म्हणजेच अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत.
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवणाऱ्या अजित पवार यांनी आज (रविवार) त्यांच्या निवासस्थानी समर्थक आमदारांची बैठक घेतली आणि त्यानंतर 18 आमदारांसह ते राजभवनाकडे रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची संधी न मिळाल्याने अजित नाराज असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्री पदाची शपथ घेवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळही मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. संध्याकाळी 6 वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. प्रफुल्ल पटेल हे सुद्धा राजभवनावर दाखल झाले आहेत.
अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार
दिलीप वळसे पाटील
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
किरण लहमाटे
सरोज अहिरे
अशोक पवार
अनिल पाटील
सुनिल टिंगरे
अमोल मिटकरी दौलत दरोडा
अनुल बेणके
रामराजे निंबाळकर
धनंजय मुंडे
निलेश लंके
मकरंद पाटील