Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक! MPSC मध्ये राज्यात तिसरी आलेल्या तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

Editorial Team by Editorial Team
June 19, 2023
in राज्य
0
खळबळजनक! MPSC मध्ये राज्यात तिसरी आलेल्या तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ADVERTISEMENT

Spread the love

रायगड । राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ) २६ वर्षीय तरुणीचा वेल्हे तालुक्यातील राजगड किल्यावरील सतीचा माळ परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दर्शना दत्तू पवार (वय २६) असे या तरुणीचे नाव असून याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना ही मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. तिने नुकतेच स्पर्धा परिक्षेतून फॉरेस्ट ऑफिसर म्हणून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने यश मिळवले होते. दरम्यान, पुण्यातील एका अॅकडमीच्या वतीने तिचा सत्कार समारंभ होता. 9 तारखेला त्यानिमित्ताने ती पुण्यात आली होती. तिच्या नर्हे येथील एका मैत्रिणीकडे ती राहत होती. 12 जून रोजी ती मैत्रिणीला सिंहगड किल्याला ट्रेकींगसाठी जात असल्याचे तिने सांगितले होते. तसेच, कुटूंबाला देखील तिने याबाबत कल्पाना दिली होती. तिच्या एका मित्रासोबत ती गेली होती.

12 जून दर्शना गेल्यानंतर तिचा फोन बंद झाला. फोन बंद झाल्याने तीन दिवस तिच्या कुटूंबाने शोध घेतला. पण, ती सापडली नाही. यानंतर दर्शनाच्या कुटूंबाने सिंहगड रोड पोलिसांत मिसिंग तक्रार दाखल केली होती. सिंहगड पोलिसांनी लागलीच तरुणीचा व त्या तरुणाचा शोध सुरू केला. त्याचदरम्यान दर्शनासोबत गेलेला तरूण देखील बेपत्ता असल्याबाबत समोर आले. त्याच्या कुटूंबाने याबाबत वारजे माळवाडी पोलिसांत मिसिंग दाखल केली. त्यानंतर या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला. 12 जूनच्या दुपारनंतर या दोघांचे मोबाईल बंद झाले होते. शेवटचे लोकेशन वेल्हा येथील आल्याने त्यानूसार पोलिसांकडून शोध सुरू होता.

आज राजगड किल्ऱ्याच्या पायथ्याला झाडांमध्ये एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. वेल्हा पोलिसांनी लागलीच धाव घेत तपास सुरू केला. तिचा मोबाईल इतर वस्तू त्याठिकाणी आढळून आल्या होत्या. पोलिसांनी त्यावरून नातेवाईकांशी संपर्क साधला. कुटूंबाने धाव घेऊन तिची ओळख पटवली. यादरम्यान, प्राण्यांनी मृतदेहाशी छेडछाड केलेली असल्याचेही समोर आले. तर दुसरीकडे दर्शनाचा मित्र देखील बेपत्ता असून, त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे नेमक घडले काय, याबाबत पोलीस आता युद्धपातळीवर तपास करत आहेत. सिंहगड रोड, वारजे आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून या घटनेचा एकत्रित तपास केला जात आहे.

Spread the love
Tags: #MPSC
ADVERTISEMENT
Previous Post

प्रेमात बळीरामाचा गेला बळी! प्रेम प्रकरणातून नाका तोंडामध्ये मिरची पावडर टाकून केली होती मारहाण

Next Post

भयंकर! खेळता खेळता दरवाजा आतून बंद झाला अन्.. गुदमरून तीन मुलांचा मृत्यू

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना

भयंकर! खेळता खेळता दरवाजा आतून बंद झाला अन्.. गुदमरून तीन मुलांचा मृत्यू

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us