ठाणे : गेल्या वर्षी राज्यात सत्तांतर झाल्यांनतर शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत सरकार स्थापन केलं होते. आगामी निवडणूक लोकसभा निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे. मात्र शिंदे गट आणि भाजपमध्ये लोकसभेच्या जागांवरून तू तू मै मै सुरू झाली आहे. त्याच एक उदाहरण म्हणजेच आधी कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावर दावा सांगणाऱ्या भाजपने आता थेट ठाणे आणि पालघरवरही दावा सांगितला आहे. त्यामुळे शिंदे गटाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाण्यातील भाजपच्या मेळाव्यात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. 2014 मध्ये मोदींमुळे निवडून आलेले लोक आता ठाणे, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीवर दावा करत आहेत. हे सर्वजणमोदी ट्रेनमध्ये बसूनच लोकसभेत निवडून गेले.
आपल्या पक्षातील असो की दुसऱ्या पक्षातील, सर्वजण मोदी लाटेत निवडून आले. आता अनेक प्रकारचे दावे करत आहेत. मला आश्चर्य वाटतं. किवही वाटते. भाजपशिवाय या जिल्ह्यात कोणीही निवडून जाऊ शकणार नाही. ठाणे, कल्याण, पालघर हा जिल्हा भाजपाचाच होता. कल्याण तर आहेच ठाणे लोकसभाही भाजपचीच आहे, असं सांगत संजय केळकर यांनी थेट शिंदे पितापुत्रांवर निशाणा साधला आहे.