जळगाव/मुंबई । सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु असून मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी अनेक इच्छूक आमदार देव पाण्यात घालून बसले आहेत अशातच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. यात जळगावातील काही आमदारांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे.
19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून, शिवसेनेच्या वर्धापन दिना आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हवा असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत मांडल्याची माहिती आहे.
हे पण वाचा..
१०वी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी! पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर
RBI ने घेतला मोठा निर्णय! आता तुम्हाला ही सुविधा मिळणार
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी बातमी : इतक्या मंत्र्यांचा शपथविधी होणार?
चुलत भावाचा झोपेत असलेल्या बहिणीवर जबरदस्तीचा प्रयत्न ; पाचोरा तालुक्यातील घटना
दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता आहे. मात्र जळगावातील काही आमदारांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यात विशेष म्हणजेच शिवसेनेचे (शिंदे गट) आ. चिमणआबा पाटील, आ. किशोरअप्पा पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच भजपाच्या वाटेला जर जळगाव जिल्ह्याला अजून एक मंत्रीपद मिळाल्यास आ. राजुमामा भोळे यांना संधी मिळू शकते.
दरम्यान, दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारत भाजपच्या सहा व शिवसेनेच्या चार जणांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे चार कॅबिनेट मंत्री तर दोन हे राज्यमंत्री आणि शिवसेनेचे दोन कॅबिनेट मंत्री तर दोन आमदर राज्यमंत्री होण्याची शक्यता आहे. तसेच जी उरलेली 13 रिक्त मंत्रिपदे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भरली जाऊ शकतात अशी देखील माहिती मिळतेय.