नाशिक : निलंबित मुख्याध्यापकाला कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी ५० हजार रुपयाची लाच स्वीकारताना नाशिक महापालिकामधील शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह लिपिकाला ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता यात कोट्यवधी रुपयांची संपत्ती सापडली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तब्बल ८५ लाख रुपये रोख रक्कम आणि ३२ तोळे सोनं अशी मालमत्ता आढळली आहे. नाशिक एसीबीने जानेवारीपासून ते आतापर्यंतच्या केलेल्या कारवाईत ही सर्वात जास्त रक्कम आढळून आलीय. तसेच सुनीता धनगर यांच्या नावावर दोन फ्लॅट आणि एक प्लॉट असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
हे पण वाचा..
तरुणांसाठी खुशखबर! राज्यात तलाठी पदाच्या ४६२५ जागांवर मेगाभरती
आता हेच बाकी होते! या देशात होणार सेक्स चॅम्पियनशिप स्पर्धा, खेळाचे नियम जाणून घ्या
खरबूज आरोग्यासाठी खुप लाभदायक ! खाण्याचे ‘हे’ 6 फायदे जाणून घ्या
प्रकरण काय?
तक्रारदार एका शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक होते. काही कारणांनी त्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यांनी शिक्षण लवादाकडे दाद मागितली असता बडतर्फीला स्थगिती देण्यात आली. तरीही शैक्षणिक संस्था त्यांना कामावर पुन्हा रुजू करत नसल्याने त्यांना कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी मनपाच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांनी ५० हजारांची लाच मागितली
त्यानंतर त्यांचे लिपिक नितीन जोशी यांनी ते पत्र बनवून देण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर नियमानुसार धनगर यांच्या घराची झडती घेण्यात आली.