सध्या उन्हाळा सुरू असून येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होईल. उन्हाळ्यात खरबूज आरोग्यासाठी खुप लाभदायक ठरते. यामुळे पाण्याची कमतरता दूर होते. आज आम्ही तुम्हाला खरबूज खाण्याचे ६ फायदे सांगणार आहोत. चला तर जाणून घेवूयात…
1. पोटाच्या मांसपेशी
यातील फोलिकमुळे रक्तात होणार्या गाठी रोखल्या जातात. वॉटर रिटेंशन कमी करते. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास हात, पाय, चेहरा आणि पोटाच्या मांसपेशींना सूज येते. खरबूज सेवन केल्याने ही समस्या दूर होते. पीरियड्समधील मांसपेशींचे दुखणे कमी करते.
2. तळलेले-भाजलेले
उन्हाळ्यात तापमानामुळे पोट खराब होते. या काळात जास्त तळलेले आणि भाजलेले खाल्ल्याने अनेक समस्या होतात. खरबूजमध्ये फायबर असल्याने पोटाच्या समस्या होत नाहीत.
3. खरबूजमध्ये भरपूर असते व्हिटॅमिन सी
यातील व्हिटॅमिन सी मुळे पांढर्या रक्तपेशी वाढल्याने इम्यूनिटी वाढते. शरीर निरोगी रहाते. बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका दूर होतो. यामध्ये अँटी-एजिंग गुण आढळतात. ज्यामुळे व्यक्ती लवकर वृद्ध होत नाही. पोटाचा अल्सर दूर राहतो.
4. व्हिटॅमिन ए बीटा-कॅरोटीन
खरबूजमध्ये व्हिटॅमिन ए बीटा-कॅरोटीनच्या रूपात असते. हे डोळयांची दृष्टी मजबूत करते. मोतीबिंदूचा धोका कमी करते. त्वचेच्या वरील पेशींसाठी लाभदायक आहे.
5. इलेक्ट्रोलाईडचे संतुलन
उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील आवश्यक मिनरल बाहेर पडतात, यामुळे इलेक्ट्रोलाईट बॅलन्स कमी होतो. खरबूजमध्ये सोडियम आणि पोटॅशियमची योग्य मात्रा असल्याने ते इलेक्ट्रोलाईटचे संतुलन कायम राखते. किडनी स्टोनवर खरबूज चांगला पर्याय आहे.
6. रक्तातील गाठी
खरबूजमधील एडीनोसीन रक्त पातळ करण्याचे काम करते. यामुळे रक्तात गुठळ्या होत नाहीत.
(टीप : वरील सर्व केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून नजरकैद कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.