जळगाव : सध्या जळगावसह राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे, जळगावमध्ये तर सूर्य आग ओकतोय. वाढत्या उकाड्यामुळे जळगावकर हैराण झाला असून यातून सुटका कधी मिळेल याची वाट पाहत आहे. अशातच हवामान खात्याने जिल्हातील काही भागात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.
त्या अनुषंगाने आज जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आज शनिवारी जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुपारपर्यंत उष्ण तापमान राहणार असून सायंकाळीनंतर वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हे पण वाचा..
रेल्वे अपघातात आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू, 900 हून अधिक लोक जखमी
गाई-म्हशीपेक्षा शेळीचे दूध जास्त शक्तिशाली ; हे फायदे वाचून व्हाल चकित..
12वी पास उमेदवारांसाठी निघाली 1600 पदांवर मेगाभरती, तब्बल 92000 पगार मिळेल..
जिल्ह्यात दोन ते तीन तालुक्यांमध्ये ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीस खबरदारी घेण्याची गरज असल्याचं हवामान खात्याने म्हटले आहे.