पुणे : मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरीसह सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. सध्या नैऋत्य वाऱ्यांना गती नसून मौसमी वारे दक्षिण अंदमानच्या समुद्रातच आहे. त्यामुळे केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन होण्यास ४ दिवस उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच 7 जूननंतर मान्सून गतीनं पुढे सरकणार असल्याचा अंदाज हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट वेदर या खासगी संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे.
वेगारीस ऑफ द वेदरकडू केरळात मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 4 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात 9 तारखेपर्यंत आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याचं भाकित वर्तविण्यात आले आहे.
हिंद महासागरातील मान्सून वाऱ्यांचा परिणाम होत असल्याने केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्यास विलंब होऊ शकतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
स्कायमेटकडून यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर भारतीय हवामान विभागाकडून यंदाचा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी उत्तरेकडे जूनपर्यंत उष्ण हवामान कायम राहण्याचा अंदाज, त्यामुळे पेरणीला देखील उशील होऊ शकतो.