मुक्ताईनगर : मुक्ताईनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. घरात सुरु असलेल्या कूलरमुळे शॉक लागून नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. वैष्णवी चेतन सनान्से असे मृत चिमुकलीचे नाव आहे. वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच तिने जगाचा निरोप घेतला. या घडलेल्या घटनेनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुक्ताईनगर शहरातील जिजाऊ नगरात चेतन सनान्से परिवारासह वास्तव्यास आहेत. चेतन सनान्से यांचे सलून आहे. चेतन सनान्से यांची मुलगी वैष्णवीचा शुक्रवारी वाढदिवस होता. शाळेला सु्ट्टी असल्याने वैष्णवी मलकापूर येथे तिच्या मावशीकडे गेली होती. वाढदिवस असल्याने तिला शुक्रवारी मुक्ताईनगर येथे तिच्या घरी आणण्यात आले होते. वैष्णवीच्या वाढदिवसाची जोरदार तयारी सुरु होती. तिच्यासाठी केक, नवीन कपडे आणण्यात आले होते. घरात स्वयंपाकाची लगबग सुरु होती.
हे पण वाचाच..
ओढणीने गळफास लावून महावितरणच्या इंजिनिअर तरुणीची आत्महत्या ; कारण गुलदस्त्यात?
उकाड्यापासून मिळणार दिलासा! हवामान खात्याने दिला हा मोठा इशारा
४ गावठी कट्टे, तलवारी, चोपरचा शस्त्रसाठा जप्त; पोलिसांच्या कारवाईने जळगावात खळबळ
नागपूरमधील ‘या’ बँकेत “लिपिक” पदासाठी बंपर भरती ; त्वरित करा अर्ज
वैष्णवी तिचे काका लखन सनान्से यांच्या घरी गेली होती. तिथून ती तिच्या घरी आली. घराबाहेर चप्पल काढताना तिला कूलरचा शॉक लागला. विजेच्या धक्क्याची तीव्र जास्त होती. वैष्णवी जागीच कोसळली. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर वीज पुरवठा खंडित करुन वैष्णवीला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. वैष्णवीची प्राणज्योत मालवली होती. वैष्णवीच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वैष्णवी दुसरीत उत्तीर्ण होऊन तिसरीत गेली होती. तिच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, आजी , बाबा, काका, काकू, चुलत भावंडे असा परिवार आहे.