अमळनेर : मळनेर तालुक्यातील मेहेरगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला. यात यात्रेसाठी बहिणीकडे आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर काळाने झडप घातली. यात्रेसाठी रिक्षातून जात असताना दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षातील २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले.
अश्विनी गुलाब भामरे असं मयत तरुणीचं नाव असून १६ एप्रिल रोजी अश्विनी हिचे लग्न ठरले होते. मात्र, लग्नाची तारीख अद्याप ठरली नव्हती. तत्पूर्वीच अश्विनीवर अपघाताच्या रुपाने काळाने झडप घातली. या अपघात प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील मेहरगाव येथील रहिवासी अश्विनी गुलाब भामरे ही अमळनेर येथील यात्रा पाहण्यासाठी १३ मेस खेडी खुर्द प्र.ज. (ता.अमळनेर) येथे राहत असलेल्या तिच्या मोठ्या बहिणीकडे आली होती. रात्री यात्रेत जाण्याचे ठरले. त्यानुसार रात्री साडेआठच्या सुमारास बहिणीची सासू व नणंद या दोघांसोबत अश्वीनी रिक्षाने अमळनेरकडे जाण्यासाठी निघाले. तर बहिण व मेव्हणे हे दुचाकीवरुन मार्गस्थ झाले. दरम्यान मेहेरगाव फाट्याजवळ टाटा मॅजिक या वाहनाने रिक्षाला कट मारला. यामुळे रिक्षा रस्त्यालगत उलटली. या अपघातात रिक्षात बसलेल्या अश्विनीच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून तिचा जागीच मृत्यू झाला. तर रेखाबाई पाटील व वर्षा हर्षल बोरसे हे दोन्ही जखमी झाले.
हे पण वाचा..
अवनीत कौरच्या बोल्ड लूकने इंटरनेटचा पारा वाढवला; फोटो पाहून चक्रावून जाल
एकांत ठिकाणी नेऊन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार ; चाळीसगाव हादरलं
चार खांदे गेले तर मी एकटा काय करू? : मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले..
Video अकोल्यापाठोपाठ आता अहमदनगरमध्ये हिंसाचार ; मिरवणुकीदरम्यान दोन गट भिडले, 8 पोलीस कर्मचारी जखमी
अश्वीनीचे नुकताच जमले होते लग्न
अपघातानंतर तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात अश्विनीला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. मयत अश्विनी हिच्या पश्चात आई– वडील, भाऊ असा परिवार आहे. अश्विनीचे काही दिवसापूर्वी लग्न जमले होते. मात्र लग्नापूर्वीच तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातप्रकरणी रविवारी दुपारी निलेश प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरुन वाहनावरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.