१७ रोजी दुपारी सामनेर तर रात्री दुसखेडे येथे मुक्काम
जळगाव – श्री संत मुक्ताबाई रामपालखीचे १६ जून रोजी सकाळी ८ वाजता अप्पा महाराज मंदिरापासून पंढरपूरकडे प्रस्थानकरण्यात आले. . वारीचे हे १४७वे वर्षे आहे. मंगेश महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ती काढण्यात आली . दुपारी शिरसोली येथे दुपारी पालखीचे आगमन झाले . यावेळी असंख्य भाविकांनी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले . यांनतर संत मुक्ताई पालखी हि वावडद्याकडे रवाना झाली असून रात्रभर येथे पालखीचा मुक्काम राहणार आहे . १७ रोजी सकाळी पालखीचे प्रस्थान होणार आहे.
संत मुक्ताबाई रामपालखी १५ जून रोजी श्रीराम मंदिरातून सायंकाळी ५ वाजता निघून या पालखीचा मुक्काम अप्पा महाराज समाधीस्थळी राहून १६ जून रोजी सकाळी ८ वाजता पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थानझाले. .१० ऑगस्टदरम्यान ही पालखी पुन्हा जळगावी परतणार आहे. संत मुक्ताबाई राम पालखीचे वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे १६ जून रोजी अभंग, आरती होऊन प्रस्थानकरण्यात आले . . दुपारचा मुक्काम शिरसोली येथे करण्यात आला . तर रात्रीचा मुक्काम वावडदा येथे होणार आहे. दुसऱ्या दिवशी वावडदा येथून पालखीचे प्रस्थान होऊन दुपारी सामनेर येथे तर रात्रीचा मुक्काम दुसखेडे येथे होणार आहे.
——–पालखीत सहभागी वारकऱ्यांना सीडबॉलचे वाटप ——-
मराठी प्रतिष्ठान व विद्या इंग्लिश स्कूल १६ जून रोजी सकाळी ११ वाजता श्रीराम मंदिराचे गादिपती मंगेश महाराज यांच्यासोबत जळगाव ते पंढरपूर पायी जाणाऱ्या संत मुक्ताबाई पालखीच्या वारकऱ्यांना सीडबॉलचे वितरण करण्यात आले . . हे सीडबॉल मराठी प्रतिष्ठानच्या महिला पदाधिकारी व नगरसेविका लता भोईटे, पूर्वा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.