जळगाव, (प्रतिनिधी)– जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून कृउबाच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या लढाईत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसला आहे तर मविआच्या पॅनलने स्पष्ट बहुमत संपादन मोठे यश मिळविले आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत महायुतीच्या पॅनलची धुरा ही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे होती. तर महाविकास आघाडीच्या पॅनलचे नेतृत्व हे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे करत होते.
आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. यात महाविकास आघाडीच्या पॅनलने पहिल्यापासून आघाडी घेतली. ती शेवटपर्यंत कायम राहिली. यात १८ जागांपैकी १० जागा जिंकून महाविकास आघाडीचे विजय संपादन केला. शिंदे गटाला सात जागांवर समाधान मानावे लागले असून एक ठिकाणी अपक्ष उमेदवाराने विजय मिळावीला आहे. या निकालामुळे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे.