जळगाव/पुणे । राज्यातील अनेक जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात गेल्या दीड महिन्यापासून अवकाळी पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसासह गारपीट झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यावरील अद्यापही अवकाळीचे संकट कायम असून अशातच आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
राज्यातील या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पिंकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच आता पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्याच्या अडचणी आणखीच वाढण्याची शक्यता आहे.
हे पण वाचाच..
घरात येताच मुलाला वडिल नको त्या अवस्थेत दिसले अन्.. जळगावातील धक्कादायक घटना
आजच मुलाच्या नावाने ‘हे’ खास खाते उघडा, आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही
सर्वात मोठी बातमी! नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ११ जवान शहीद
शंबर-दोनशे नव्हे.. मुकेश अंबानींनी कर्मचाऱ्याला गिफ्ट केला तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींचा बंगला
आज या जिल्ह्याना वादळी पावसाचा यलो अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर आज नाशिक, नगर, पुणे, परभणी, हिंगोली, नांदेड या भागात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.