जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय म्हणाले?
बाळासाहेब ठाकरे यांनी हे पूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. त्या काँग्रेसवाल्यांनी आमचे पठ्ठे फोडले. त्यांच्याबरोबर आम्ही बिलकुल जाणार नाही. राहुल गांधी यांनी भगवा झेंडा हातात घ्यावा. त्यांनी जर भगवा झेंडा हातात घेतला तर आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरेंना आम्ही यापूर्वी सावध केलं होतं की पुढे रेड झोन आहे. गाडी फेल होईल. जाऊ नका. आपण आता इथेच गाडी थांबवली पाहिजे. रस्ता चुकीचा दिसतोय. मात्र गाडीतले संजय राऊतसारखे काही चुकीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर भेटले. त्यामुळे गाडीचा अपघात झाला. गाडी दिशाहीन झाली. शिवसेनाप्रमुखांनी जी शिवसेना उभी केली ती भगव्या करता केलेली आहे हिंदुत्व करता केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आम्ही कधी बसू शकतो, हे कधीच होणार नाही, असं पाटील म्हणाले.
हे पण वाचा..
मोठी बातमी! ..तर राजीनामा तयार ठेवा, शिंदेंना दिल्लीतून सूचना?
अवकाळीचे संकट कायम, जळगावला पुढचे चार दिवस महत्त्वाचे
शेतकऱ्यांनो..! कापूस बियाणे खरेदी करताय? शासनाने ठरविलेल्या बियाण्याच्या ‘या’ आहेत किंमती?
कार्यकर्ता बॅनर लावतो
नेत्यावर प्रेम असणारा कार्यकर्ता नेत्यांचे बॅनर लावतो. यापूर्वीही कार्यकर्त्यांनी माझे बॅनर लावले होते. मला राज्यमंत्रीपद मिळावं म्हणून जळगावात बॅनर्स लावण्यात आले होते. त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचेही बॅनर्स लागले असतील. कार्यकर्त्यांच्या भावनतेून त्याकडे पाहिले पाहिजे, असं ते म्हणाले.