जळगाव : आज पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सभा होणार असून सभेआधी शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद चांगलाच पेटलेला बघायला मिळतोय. संजय राऊत सातत्याने गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करुन त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता गुलाबराव पाटील यांनी देखील मोठा इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
“उद्धव ठाकरे यांच्या सभेला कुणीही विरोध केलेला नाही. आर ओ तात्यांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला कुणीही विरोध केलेला नाही. आर ओ तात्या आमचे जीवलग मित्र होते. ते आमच्या प्रत्येक सुख-दु:खात येणारे होते. त्यांच्या पुतळाच्या कार्यक्रमादरम्यान संजय राऊत नेहमी वेगळं वक्तव्य करत आहेत. आमचा त्यांना विरोध आहे. ते आजही गुलाबी गँग बोलले. त्यांना सगळं बोलायची मुभा आहे का?”, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.
हे पण वाचाच..
महाराष्ट्रात पाऊस, पीकपाणी कसं राहणार? भेंडवळची भविष्यवाणी जाहीर
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
कोरोनाबाबत भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे खळबळ, मुलांसाठी ‘हा’ मोठा धोका आहे
केंद्रीय नोकरीची मोठी संधी..! भाभा अणु संशोधन केंद्र मुंबईत 4374 जागांसाठी भरती
“माझ्या माहितीप्रमाणे हे जे नतद्रष्ट लोकं आहेत, ज्यांनी शिवसेनेची वाट लावली त्यांना आमचा विरोध आहे. ते म्हणाले मी जळगावात पाय ठेवला. रेल्वे स्टेशनवर दिसलं ना काय झालं, संजय राऊतांना दिसलं तिथे काय झालं ते, एकही कार्यकर्ता येऊ देणार नाही आणि आले तर जाऊ देणार नाही असं बोलत होते. अहो रेल्वे स्थानकावर कार्यकर्ते येऊन गेले. ते आले आणि वापस गेलेही. आम्हाला या आयडिया शिकवू नये. राऊत कोणत्याच आंदोलनात नव्हते. शिवसेनेचं आंदोलन कसं करावं हे त्यांना माहिती नाही. आम्ही दगडं मारुन लोकांच्या सभा बंद करणारे लोकं आहोत. त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करु नये”, असा मोठा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.