जळगाव,(प्रतिनिधी)- मानवता” आणि” मुक्तिदाता भीमराव ” या दोन कविता संग्रह प्रसिद्ध करून आंबेडकरी चळवळीत साहित्याची भर घालणारे दलित मित्र पुरस्कार प्राप्त( महाराष्ट्र शासन)प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे यांचे आज दिनांक २२ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले असून त्यांच्यावर दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता नेरी नाका स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांच्या पच्छात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. जावई प्रा. युवराज मेढे,बी. एम. फाउंडेशनचे संस्थापक योगेश नन्नावरे, अतुल नन्नावरे यांचे ते वडील होतं.
आदर्श शिक्षक,साहित्यिक,कवी लेखक,पत्रकार अशा अनेक भूमिका प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे यांनी आपल्या खऱ्या आयुष्यात प्रभावी पणे निभावून आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली आहे.
आकाशवाणी केंद्रावर किमान ५० वेळा मुलाखत तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम विचार प्रसिद्ध झाले असून त्यांच्या प्रत्येक कार्यातून तरुणांना आंबेडकरी चळवळीचे बाळकडू मिळाले आहे.संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीला वाहून घेणाऱ्या या त्यागमुर्तीने मुंबई दूरदर्शन वृत्तांत मध्ये कविता संग्रह तसेच विविध प्रकारचे व्याख्यान आयोजित करून सामजिक क्षेत्रात कार्य केले.
शैक्षणिक क्षेत्रात प्राचार्य म्हणून सेवेत असल्याने शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे… ते पिल्या नंतर मनुष्य गुर गुरल्या शिवाय राहत नाही हे बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य हृदयावर कोरल्या गेल्याने हजारो शोषित, पीडित, वंचित,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली. स्वतःच्या कष्टाच्या पगारातील पैसे खर्च करून अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी देखील भरली. यासोबतच युवकांना रोजगाराभिमुख मार्गदर्शन तसेच समजाला दिशा देणारे उल्लेखनीय कार्य मागील ६० वर्ष पासून केले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामांतर चळवळीत प्राचार्य भगवान श्रीपत नन्नवरे यांचे भरीव योगदान आहे. वृतपत्र हे वैचारिक क्रांतीचे मोठं माध्यम असल्याची जाण असल्याने पत्रकारितेची सुरवात “बहुजन कला” हे मासिक वृत्तपत्र काढून केली आहे.