मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी जेलमध्ये जाण्याच्या भीतीने बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केली, असा मोठा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान, एकीकडे सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. सुप्रीम कोर्टात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. पण त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबद्दल सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे.हैदराबाद येथे एका मुलाखतीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
हे पण वाचा..
8वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी..मेल मोटर सर्व्हिस, मुंबई मध्ये भरती
अरे बापरे..! 230 दिवसांनंतर देशात आढळली सर्वाधिक कोरोनाची संख्या
अरे वा..! आता EMI वरही आंबा मिळेल, आजच खरेदी करा आणि 12 महिन्यांत पैसे द्या
दुधाळ जनावरे खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळत आहे लाखांपर्यंत कर्ज, अशा प्रकारे करा अर्ज
आदित्य ठाकरे म्हणाले, हे चाळीस आमदार केवळ पैशांसाठी आणि त्यांच्या जागेसाठी गेले आहेत. सध्याचे मुख्यमंत्री घरी येऊन रडले होते. आपण भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी येऊन अक्षरश: रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, हे त्यांचं नशीब आहे की, त्यांना निर्दोष आणि मूळ शिवसेना म्हणत मुख्यमंत्री केले गेले. पण त्यामुळे त्यांनी आमचा केलेले विश्वासघात आणि आम्ही त्यांना एवढं सगळं दिल्यानंतर त्यांनी पाठीत खुपसलेला खंजीर हे आमच्यासाठी गद्दारीच आहे.