मुंबई : सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. ती म्हणजे गेल्या दोन ते अडीच वर्षानंतर खाद्य तेलाच्या किंमती खाली आल्या आहेत. खाद्य तेलाच्या किमतीत जवळपास २२ ते २५ टक्क्यांनी घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाची मागणी आणि दर कमी झाले आहे. यामुळे याचा परिणाम देशांतर्गत खाद्य तेलाच्या किमतीत घसरल्या आहे.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून खाद्य तेल व इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारपेठात खाद्यतेल पुरवठा साखळी युक्रेन रशिया युद्धामुळे विस्कळीत झाली होती मात्र आता ती स्थिती पूर्वपदावर आली आहे. शिवाय खाद्यतेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी,दर आणि देशभरात झालेले तेलबियांचे एकूण उत्पादन या सगळ्यावर अवलंबून असते आणि त्यामुळे यंदाच्या वर्षी किमती कमी होण्यामागची ही सर्व कारणे समोर आली आहे.
हे पण वाचा..
प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-अमरावती विशेष गाडी धावणार, ‘या’ स्टेशनवर थांबणार?
ISRO : भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरी मिळविण्याची संधी..
शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड! काही मिनिटांत केली गव्हाची कापणी, Video होतोय तुफान व्हायरल
खाद्य तेलाच्या किमतीत जवळपास २२ ते २५ टक्क्यांनी घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या हंगामात मोहरीचे तेल 165 ते 170 रुपये लिटर या किमतीत विकले जात होते, आता ही किंमत कमी होऊन 135 ते 140 रूपये प्रति लिटरवर आली आहे. मोहरीने गेल्या वर्षीचाच ट्रेंड कायम ठेवल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील एका महिन्यात मोहरीचे तेल 10 टक्के, सोयाबीन तेल 3 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. मागणी घटल्याने सोयाबीन खाद्य तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. रिफाइंड सोयाबीन तेलाचा भाव 140-145 रुपयांवरून 115-120 रुपये प्रति लिटर आणि सूर्यफूल तेलाचा दर वर्षभरात 135-140 रुपयांवरून 115-120 रुपयांपर्यंत खाली आला आहे.