मुंबई,(प्रतिनिधी)- आर्केस्ट्राच्या नावावर ‘डान्सबार’ चालवणाऱ्यावर पोलिसांनी ‘संक्रांत’ केली आहे,गेल्या काही दिवसांपासून पोलिसांची धडक मोहीम राबवत आहे दरम्यान गुरुवारी सांताक्रुज येथील एका बार वर धडक कारवाई केली यात मालक,९ ग्राहक, वेटर यांना ताब्यात घेत १३ बारबालांची सुटका केली आहे या कारवाईने खळबळ उडाली आहे.
सांताक्रुज येथील गजझर बांधमध्ये लक्षद्विप नावाचे एक प्रसिद्ध बार आणि रेस्ट्रॉरंट आहे. या बारला आर्केस्ट्राचा परवाना असताना त्या ठिकाणी डान्सबार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्यावर पोलीस पथकाने छापा टाकला होता. यावेळी बारच्या पहिल्या मजल्यावर काही बारबाला तिथे उपस्थित ग्राहकांशी अश्लील चाळे करताना दिसून आल्याने कारवाई केली.
यावेळी पोलिसांनी बारचा चालक, मॅनेजर, कॅशिअर, ०६ वेटर आणि ०९ ग्राहक असे एकूण १८जणांना ताब्यात घेतले होते. दरम्यान यावेळी तिथे असलेल्या १३ बारगर्लची सुटका करण्यात आली. तर या अठराजणां विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
डान्सबार मध्ये असलेल्या ग्राहकांसमोर बारगर्ल अश्लील नृत्य करत असल्याचे पोलीस पथकाला दिसून आले त्याचबरोबर चालक, बार मॅनेजर, कॅशियर वेटर, हे अश्लील नृत्यास प्रोत्साहीत करत असताना दिसुन आले. म्हणुन यातील फिर्यादी नितीश हरिशचंद्र ठाकूर, वय ३७ वर्ष, यांनी आस्थापनेचे १ बार चालक, १ बार मॅनेजर, १ बार कॅशियर, ६ बारबार वेटर, ०९ ग्राहक यांचे विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून सांताका पोलीस ठाण्यात कलम १८८, ३४ भादविसह कलम ३,८ (१), ८(२), ८(४), महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि मदयपान कक्ष (बार रूम) यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम सन २०१६ अन्वये दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत रोख रक्कम रुपये १६,८००/- ऑक्सफेबल (किमत अंदाजे ५००/-) १ ॲम्प्लिीफायर, (किमत अंदाजे २३०००/-)१, स्पीकर (किमंत अंदाजे ८०००/-), असा मुद्देमाल तपासकामी जप्त करण्यात आला आहे.