महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण 146 रिक्त पदांची भरती याद्वारे केली जाणार आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या पदभरतीचा फायदा घ्यावा.
एकूण – 146 रिक्त पदे
या पदांची होणार भरती
वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, राज्य कामगार विमा योजना, गट-अ या पदांची भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराची शैक्षणिक पात्रता ही MBBS असणे आवश्यक आहे.MPSC Bharati 2023, MPSC, Job
वयोमर्यादा
या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय हे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट] यांना 19 ते 38 वर्षे इतके असणे आवश्यक आहे.
अर्जशुल्क
तर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जशुल्क आकारला जाणार आहे. तर यासाठी खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]
इतका आकारला जाणार आहे.
वेतन
56,100 ते 1,77,500/-अधिक नियमानुसार अनुज्ञय भत्ते
हे पण वाचा..
10वी पाससाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ९ हजाराहून अधिक पदांची भरती
बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ; SBI मध्ये सुरूय 1022 पदांसाठी भरती
कृषी विमा कंपनीत नोकरी मिळविण्याची मोठी संधी… तब्बल 60,000 रुपये प्रतिमहिना मिळेल
10 वी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! HQ दक्षिणी कमांड पुणे येथे मोठी भरती
या पदासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून, या पदभरतीसाठी अर्ज करण्याची मुदत 10 एप्रिल पासून सुरु होणार असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 पर्यंत आहे. (MPSC Bharati 2023)
अर्ज कसा करावा
या पदभरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंक वरती क्लीक करावे. तसेच या पदभरती बद्दल अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत संकेतस्थळ : http://mpsconline.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.