नाशिक – न्यालयातील कागदपत्रांना आग लावण्यात आल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. यामध्ये न्यायालयातील एका टेबलवरील सुमारे १५० पेक्षा जास्त फाईल जळाल्याचे निदर्शनास आले आहे.
पोलीसांनी केलेल्या पाहणीत अधिक माहिती अशी कि, पोलीस प्रशासनाकडुन जिल्हा न्यायालयाने ताब्यात घेतलेल्या बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या प्रथम वर्ग न्यायालयात आज पहाटे हा प्रकार घडला. या न्यायालयीन इमारतीची खिडकी फोडुन खिडकीतून आत राँकेल ओतून त्यास आग लावण्यात आल्याचे समोर आले आहे.
सकाळी १० वाजता शिपायाने न्यायालय उघडताच हा प्रकार उघडकीस आला. तात्काळ अग्निशाम दलास पाचारण करण्यात येऊन आग विझवण्यात आली. या आगीत न्यायालयीन कामकाजाच्या १५० पेक्षा जास्त फाईल असल्याचे समोत येत आहे. पोलीस उपायुक्त, सरकारवाडा पोलीसांकडुन पाहणी करण्यात येत असून मुख्य न्यय़ाधिशांबरोबर सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे.