जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ ते भादली दरम्यान चौथ्या मार्गाचे काम सुरू असल्याने उद्या गुरुवार, 30 मार्च आणि शुक्रवार, 31 मार्च असे दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी महाराष्ट्र एक्सप्रेस, अमरावतीसह तब्बल 30 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस, अमरावती-सुरत एक्स्प्रेस आणि मुंबई-हावडा मार्गावरील महाराष्ट्र एक्स्प्रेस २९ मार्च ते १ एप्रिलदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, काही गाड्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचा वेग मर्यादित करण्यात आला आहे असे रेल्वेेने कळविले आहे.
कोणती ट्रेन कधी रद्द?
पुणे-अमरावती एक्सप्रेस – २९ मार्च अमरावती-पुणे एक्स्प्रेस – ३० मार्च सुरत-अमरावती एक्सप्रेस – ३० आणि ३१ मार्च अमरावती-सुरत एक्सप्रेस – ३१ मार्च आणि १ एप्रिल नागपूर-अहमदाबाद एक्सप्रेस – 29 मार्च अहमदाबाद-नागपूर एक्सप्रेस – 30 मार्च पुणे-नागपूर एक्सप्रेस – 30 मार्च नागपूर-पुणे एक्सप्रेस – 31 मार्च भुसावळ – वर्धा एक्सप्रेस – 31 मार्च वर्धा – भुसावळ एक्सप्रेस – 31 मार्च कोल्हापूर – गोंदिया एक्सप्रेस – 29 मार्च गोंदिया – कोल्हापूर एक्सप्रेस – 31 मार्च मार्च