वाहन चालकांचा हलगर्जीपणा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चुकांमुळे विनाकारण अपघाताला आमंत्रण दिले जाते. सध्या एका जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघांचाही प्रताप पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये पती पत्नी दुचाकीवरुन प्रवास करताना दिसत आहेत. पहिली चूक म्हणजे गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने डोक्याला हेल्मेटचं घातलेले दिसत नाही. आणि दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे ही व्यक्ती चालू गाडीवर सिगारेट ओढताना दिसत आहे. ज्यासाठी त्याला पाठीमागे बसलेली बायकोच मदत करताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CqTK5lToCac/?utm_source=ig_web_copy_link
गाडी चालवणाऱ्या तरुणाला सिगारेटची झालेली तलफ त्याची पत्नी पुर्ण करत आहे. पाठीमागे बसून ती सिगारेटचे झुरके त्याला देत आहे तर तो तरुण गाडीवर दुर्लक्ष करुन पाठीमागे वळून आरामात सिगारेट ओढताना दिसत आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे त्यांच्या गाडीवर समोर त्यांचा चिमुकला मुलगा बसलेला असताना हा सर्व प्रकार सुरू आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांनी या दोघांना चांगलेच फैलावर घेतले आहे.