पुणे : पुण्यातून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा मतदारसंघातून आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाले असताना आता भाजपला तिसरा मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांचे आज निधन झाले. वयाच्या ७२ वर्षी बापट यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून बापट आजारी होते. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दरम्यान गिरीष बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहेत
कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. आणि हा किल्ला घडवण्याचे कार्य गिरीश बापट यांनी केले होते.गिरीश बापट महाराष्ट्राच्या 13 व्या विधानसभेचे सदस्य होते. हे कसबा पेठ मतदारसंघातून निवडून गेले.1995 पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. गिरीश बापट यांची 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड झाली आहे. त्यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव केला होता
संघ स्वयंसेवक, नगरसेवक ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे टेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही.