नवी दिल्ली : मोबाईल क्रांतीनंतर देशात डिजिटल क्रांती आल्यामुळे वारंवार बँकेत जाण्याची गरज उरली नाही. एटीएमच्या चकराही कमी झाल्या आहेत. सगळीकडे डिजिटल पेमेंटमुळे झटपट व्यवहार सुरु झाले. पण जर तुम्ही नियमितपणे UPI द्वारे पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुम्हाला झटका देऊ शकते. कारण UPI पेमेंटसाठी आता तुम्हाला खिसा खाली करावा लागणार आहे.
नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच १ एप्रिल २०२२ पासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसद्वारे (UPI) व्यवहारावर शुल्क आकारले जाण्याची तयारी केली जात आहे. भारतीय राष्ट्रीय देयके मंडळाने (NPCI) एक अधिसूचना काढली आहे. त्यानुसार, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे UPI च्या माध्यमातून मर्चंट ट्रान्झॅक्शनवर प्रीपेड पेमेंट इंस्ट्रमेंट्स (PPI) शुल्क आकारण्याची सूचना केल आहे. अधिसूचनेनुसार, 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या UPI व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क मर्चंट ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यापाऱ्यांना पेमेंट करणाऱ्या युझर्सकडून वसूल करण्यात येणार आहे.
बिझनेस स्टँडर्डने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, प्रीपेड पेमेंट इंस्ट्रमेंट्स (PPI) शुल्क व्यवहारांवर लागू आहे. UPI व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क मर्चंट ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यापाऱ्यांना पेमेंट करणाऱ्या युझर्सकडून घेण्यात येईल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने (NPCI) अधिसूचनेत, या नवीन बदलाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. 30 सप्टेंबर 2023 रोजी पूर्वी हा आढावा घेण्यात येईल, असे एनपीसीआयने स्पष्ट केले आहे.
हे पण वाचा..
धक्कादायक ! भरधाव डंपरने १५ बकऱ्यांना चिरडले, जळगाव तालुक्यातील घटना
जळगावातील मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या गावी दोन गटात तुफान वाद : रस्त्यावर दगड, काचांचा खच
महागाईचा झटका! जीवनावश्यक औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढणार
काय आहे युपीआय
UPI म्हणजे युनिफाईट पेमेंट्स इंटरफेस एक जलद पेमेंट सेवा आहे. ही सेवा मोबाईल क्रमाकांच्या माध्यमातून काही सेकंदातच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पेमेंट ट्रान्सफर करते. भारतीय राष्ट्रीय देयके मंडळाने (NPCI) ही पेमेंट पद्धत विकसीत केली आहे. व्हर्चुअल पेमेंट ॲड्रेस (VPA) या माध्यमातून बँक खात्याचा तपशील देण्याची गरज नसते. त्यामुळे ही पद्धत सुरक्षित मानण्यात येते.