नवी दिल्ली : गेल्या महिन्यात किरकोळ महागाईत मोठी वाढ दिसून आल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने गव्हाच्या किंमती घटविण्याची आग्रही मागणी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर मोदी सरकारने गव्हाचा मोठा साठा बाजारात उतरवला. त्यामुळे गव्हाच्या किंमती घसरल्या. मोदी सरकारने दुसऱ्यांदा गव्हाचे दर स्वस्त केले आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने (DFPD) याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने गव्हाची राखीव किंमत कमी केली आहे. या कमी किंमती 31 मार्च 2023 पर्यंत लागू असतील. तोपर्यंत नवीन गव्हाचे पीक हाती येईल आणि खुल्या बाजारात गव्हाची आवक वाढेल. त्याचा फायदा होईल.
सध्या केंद्र सरकारने खुल्या बाजारात विक्री योजनेतंर्गत सरासरी दर्जाच्या गव्हाची किंमत 2150 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. हा दर संपूर्ण देशासाठी लागू असेल. तर अंडर रिलॅक्स स्पेसिफिकेशन्स (URS) गव्हाची किंमत 2125 रुपये प्रति क्विंटल असेल. संपूर्ण देशासाठी हीच किंमत असेल.
हे पण वाचा..
पतीने बोलण्याच्या बहाण्याने पत्नीला खोलीत नेले, अन्…; आता पोलीस घेतेय त्याचा शोध..
खुशखबर.. आज महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त
शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी ; सरकार खात्यात 3,000 रुपये ट्रान्सफर करणार
अत्यंत दुर्दैवी! रुद्राक्ष महोत्सवाहून परततांना भीषण अपघात ; जेठाणी-देराणी ठार
केंद्र सरकारनुसार, या किंमती खासगी मिल्स आणि व्यापाऱ्यांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. आता खासगी व्यापारी या किंमतींचा आधार घेऊन बोली लावू शकतील. राज्य सरकार पण याच किंमतींना आधारभूत मानून विविध योजनातंर्गत गव्हाचे वितरण करु शकतील. राज्यांना निश्चित दरावर गव्हाच्या खरेदीची विशेष सवलत असेल. त्यांना बोलीत सहभाग घेण्याची गरज नाही.