मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या बोर्डाची १० वी, १२ वीची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे परीक्षेच्यावेळी प्रश्नपत्रिकेचे आकलन करण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे अतिरिक्त वेळ मिळणार आहे. याबाबत बोर्डाने वेळेसंबंधीची सुधारणापरिपत्रक जारी करून केली आहे.
याआधी १० वी, १२ वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेच्या १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिका आकलनासाठी देण्यात येत होत्या, मात्र त्यामुळे प्रश्नपत्रिका मोबाईल तसेच सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याच्या अफवा आणि घटना घडल्या होत्या. कॉपीच्या घटनांना आळा घालण्यासाठीच मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षांपासून प्रश्नपत्रिका १० मिनिटे आधी देण्याचा नियम रद्द केला, परंतु कोरोना काळात बहुतांश परीक्षा ऑनलाईन झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाल्याचे मत व्यक्त करीत पालकांनी हा निर्णय मागे घेण्याचा आग्रह मंडळाला केला. त्यानंतर मंडळाने पालकांची मागणी मान्य केली आहे. यासंदर्भातील सुधारणा मंडळाने परिपत्रक काढून जारी केली आहे.
हे पण वाचा..
VIDEO मुंबईत द बर्निंग ट्रेनचा थरार! धूर निघू लागताच अन्…
10वी उत्तीर्णांनो घाई करा! डाक विभागात 40889 पदांसाठी भरती, अर्जसाठी उरले अवघे काही तास..
सर्वोच्च न्यायालयाकडून तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; म्हणाले..
अल्पवयीन मुलीचा सख्ख्या बापाकडूनच विनयभंग ; जळगावातील धक्कादायक प्रकार
परीक्षेची सध्याची वेळ
सकाळचे सत्र
स. ११.०० ते दु. २.००
स. ११.०० ते दु. १.००
स. ११.०० ते दु. १.३०
दुपारचे सत्र
दु. ३.०० ते सायं. ६.००
दु. ३.०० ते सायं. ५.००
दु. ३.०० ते सायं. ५.३०
परीक्षेची सुधारित वेळ
सकाळचे सत्र
स. ११.०० ते दु. २.१०
स. ११.०० ते दु. १.१०
स. ११.०० ते दु. १.४०
दुपारचे सत्र
दु. ३.०० ते सायं. ६.१०
दु. ३.०० ते सायं. ५.१०
दु. ३.०० ते सायं. ५.४०