ठाणे : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गटाकडून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देणे सुरु आहे. एकीकडे शिवसेनेला खिंडार पडलेले असताना आता राष्ट्रवादीला देखील मोठे भगदाड पडणार आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे तब्बल 22 नगरसेवक पक्षाची साथ सोडण्याची शक्यता आहे.
स्थानिक महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तब्बल 22 नगरसेवक राष्ट्रावादी पक्षाची साथ सोडणार अशी माहिती समोर आली आहे. हा गट वेगळा गट स्थापन करणार अथवा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता आहे. या 22 पैकी 6 नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. हे 6 ही नगरसेवक दिग्गज आहे.
विशेष म्हणजे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मोठी खेळी मानली जात आहे. मुंब्रा आणि कळवा येथील अनेक नगरसेवकांसह शेकडो NCP पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वाटेवर आहे. ठाणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्ष इतर पक्षांना सुरुंग लावण्याच्या तयारीत आहे.
हे सुद्धा वाचा..
मोठी बातमी ! 128 औषधांच्या नवीन किमती जाहीर, जाणून घ्या
शेतकऱ्यांना काहीसा दिलासा! कापसाच्या दरात झाली वाढ
अरे देवा..! सोन्याने ओलांडला 57,000 टप्पा, चांदीही वाढली ; तपासून घ्या नवीन दर
विमानात प्रवाशाचे हवाईसुंदरीसोबत हुज्जत; घटनेचा धक्कादायक Video व्हायरल
विशेष म्हणजे, मध्यंतरी शिंदे गट आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये चांगलाच सामना रंगला होता. आव्हाड यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले होते. त्याचबरोबर त्यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. आव्हाड यांच्या गडाला सुरूंग लावण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात ठाण्यात मोठ्या घडामोडी घडणार आहे.