मुंबई : गेल्या सात ते आठ महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही तर फेब्रुवारीमध्ये सरकार कोसळणार असं भाकीत वर्तवलं आहे. पण, आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून एक खळबळजनक दावा केला आहे. सरकारने काउंटडाऊन सुरू झाले आहे,असे ते म्हणाले आहे.
ट्विटमध्ये काय म्हटले आहे?
‘सरकारचे काउंट डाऊन सुरू. शिवजयंती पूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की’ असं मिटकरी म्हणाले आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये राज्यात पुन्हा सत्तांतर होणार का, अशी चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (दि.20) शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय बंगल्यावर भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांच्या भेटी मागचं कारण अस्पष्ट असून पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या दोघांच्या झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
हे पण वाचा..
10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर.. कर्मचारी निवड आयोगाकडून 11409 पदांची बंपर भरती
मोफत रेशन घेणार्या करोडो लोकांसमोर नवीन संकट, सर्व कार्डधारकांनी जाणून घेणे गरजेचे
शुभांगी पाटील यांनी घेतली नाथाभाऊंची भेट ; नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये काय घडणार?
दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मंत्रिमंडळ विस्तार की शिवसेनेतील धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेला वाद यामध्ये काय चर्चा झाली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.