जळगाव : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कोण जिंकणार याची उत्कंठा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मुक्ताई नगरातील निवासस्थानी भेट घेतली आहे.
या दरम्यान, मुक्ताईनगरात येऊन मी माहेरी आले, मला माहेरची साडी भेट देत आशीर्वाद नाथाभाऊंनी मला दिला आहे.आई-वडिलांकडून जो आशीर्वाद पाहिजे होता तोच मिळाला आहे, त्यामुळे माझ्या यशाचा मार्ग सुकर होणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या निवडणुकीत एकिकडे काँग्रेसशी दगाफटका करत सत्यजित तांबे यांनी वेगळी वाट धरली. तर शुभांगी पाटील यांच्या पाठिशी महाविकास आघाडी भक्कमपणे उभी राहिल्याचं चित्र आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या भेटीनंतर मी आता एकनाथ खडसे यांचा आशीर्वाद घेतला आहे. आता पदवीधरांच्या प्रश्नावर फोकस करून प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहेत, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली.
नाशिक मतदारसंघात काय स्थिती?
राज्यातील विधान परिषद निवडणुकांमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या क्षेत्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे येथे मागील तीन टर्म निवडून आले. त्यामुळे त्यांनाच काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली व त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला