भुसावळ,(प्रतिनिधी)- हिंदुसूर्य क्षत्रिय कुलभूषण महाराणा प्रतापसिंहजी यांच्या ४२६ व्या पुण्यतिथी निम्मित राजपूत समाज भुसावळ व श्री राजपूत करणी सेनेमार्फत प्रतिमा पूजन करण्यात आले.याप्रसंगी कॅप्टन डॉ राजेंद्रसिंग राजपूत यांचे व्याख्यान झाले. त्यांनी हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंहजी यांच्या संघर्षमय जीवन कथेची माहिती देऊन त्यांचा इतिहास डोळ्यासमोर उभा केला आणि महाराणाजींचा स्वाभिमान व संघर्ष समाज बांधवांनी आदर्श म्हणून घ्यावा व एकमेकांना सहकार्य करून समाजाला प्रगत करण्यात सहकार्य करावे असे आवाहन केले.
श्री राजपूत करणी सेना 2023 दिनदर्शिकाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रम नंतर हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंहजी चौकात येऊन प्रतिमा पूजन करण्यात आले. हिंदूसूर्य मेवाडनरेश महाराणा प्रतापसिंहजी यांच्या बद्दल रणरागिणी आराध्या राजेंद्र राजपूत हिने प्रेरणादायी चार ओळी उपस्थित मान्यवरांसमोर सादर केल्या. शौर्य कभी भी सो जाये तो महाराणा प्रतापसिंहजी को पढ लेना… या प्रेरणादायी सादरीकरनासाठी सर्वच मान्यवरांनी आराध्या हिचे खूप कौतुक केले
याप्रसंगी संजयसिंग चौहान,योगेंद्रसिंग पाटील,अभिजीतसिंह पाटील,संदिपसिंग राणा,पवन मेहरा,विकी राजपूत,प्रवीण पाटील,सोनी ठाकूर,बी.एन.पाटील, चंद्रसिंग बोरसे,भरत पाटील,राजुभाऊ पाटील,धनसिंग पाटील,राजेंद्र ठाकूर,अमोल पाटील,गणेश जगताप,दामोदर राजपूत,मनिष परदेशी,लतेश भंगाळे,नंदकुमार पाटील,दिवानसिंग राजपूत,अमोल पाटील,श्री राजपूत करणी सेना व विविध सामाजीक संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते