जळगाव : जळगावात एक धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात राहणार्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. हा मुलगा शिक्षणासाठी जळगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास होता. हा प्रकार पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना कळल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी जळगावातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत रामानंद नगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा वास्तव्याला असून तेथे तो शिक्षण घेत आहे. १२ जानेवारी रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्याला एका मोबाईल क्रमांकवरील गुड्डू नावाच्या अंदाजे २८ वर्षीय तरुणाने १२ जानेवारी रोजी जळगाव शहरात बोलवून घेतले. त्यानंतर अल्पवयीन मुलाला जळगाव शहरातील एका भागात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केल आहे.
हे पण वाचा
आज या राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल; काय म्हणते तुमची राशी? घ्या जाणून
अंगणवाडी मार्फत मिळणाऱ्या पोषण आहारात आढळली मृत पाल; जळगावातील धक्कादायक प्रकार
गतिमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्यांची गर्भवती ; जळगाव जिल्हा हादरला