मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार आजच होणार आहेत. राज्य सरकारने तातडीने 300 कोटी वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे आजच सर्व कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची संक्रात गोड होणार आहे
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला 7 तारखेला वेतन होत असते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक तुटवट्यामुळे वेतन वेळेत होत नाही. ते ७ ते १० या तारखेपर्यंत पगार देण्याची हमी राज्य शासनाने संपाच्या दरम्यान न्यायालयात दिली होती. मात्र अजूनही वेतन वेळेत होत नाही, त्यामुळे कर्मचारी त्रस्त आहेत.
हे देखील वाचाच ..
8वीतील मुलगा 6वीत शिकत असलेल्या मुलीच्या घरात शिरला अन्.. मुलाच्या कृत्याने गावातील सर्वच जण हादरले
अबब…! मोदींनी उद्घाटन केलेल्या ‘गंगा विलास’ क्रूझचे भाडे वाचून चक्रावून जाल..
आजपासून बदलणार ‘या’ 5 राशींचे भाग्य! तुमची तर नाही यात राशी??
पुण्यातील डिफेन्स अॅकॅडमीमध्ये 10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स, त्वरित अर्ज करा
वेतनाला महिन्याला ३६० कोटी रुपये लागतात. शिंदे सरकार फक्त महिन्याला १०० कोटी देत आहे. त्यामुळे कोर्टात सांगितल्याप्रमाणे सरकार वागत नसल्यामुळे, या संदर्भात वकिलांचा सल्ला घेऊन अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस यांनी घेतला होता.