पुलवामा : देशात महिलांवर होणारे अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. एका नराधम दीराने आपल्याच वहिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या कृत्याला विरोध केला असता, त्याने वहिनीची गळा दाबून हत्या केली. असून शबाना (वय २९ वर्ष) असं मृत महिलेचं नाव असून जुबेर (वय २१ वर्ष) असं नराधम दीराचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ४८ तासांत तपासाची चक्रे फिरवत नराधम दीराला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत महिलेचा पती हा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. त्यावेळी घरात फक्त मृत महिला आणि तिचा दीर आरोपी जुबेर हे दोघेच होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुबेर याची मृत शबाना हिच्यावर वाईट नजर होती.
मंगळवारी (१० जानेवारी) घरात कुणी नसल्याची संधी साधून त्याने वहिनीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला वहिनीने विरोध केला असता, आरोपीने गळा दाबून तिची हत्या केली. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, हत्येनंतर आरोपीने वहिनीच्या मृतदेहावर बलात्कार केला.
दरम्यान, हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर आरोपीने घरातून पळ काढला. सकाळ होऊन सुद्धा घरातून कुणीच बाहेर न आल्याने शेजारील महिलेने दार ठोठावले. मात्र, कुणी प्रतिसाद देत नसल्याने तिने खिडकीतून डोकावून बघितले असता, हा प्रकार उघडकीस आला.