बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. यागाण्यात दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, आता अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने बेशरम रंग हे गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडीओमधील रिंकूच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी रिंकूनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन तिला ट्रोल केलं आहे. मोत्याचे इअरिंग्स, मोत्याचं गळ्यातलं आणि पिंक कलरचा प्रिंटेड ड्रेस अशा लूकमध्ये रिंकू दिसत आहे. रिंकूच्या या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.
https://www.instagram.com/reel/Cm5xxj-hoGS/?utm_source=ig_web_copy_link
नेटकऱ्यांच्या कमेंट्स:
रिंकूनं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘एवढा पैसा आलाय तर तो दात का काढत नाहीस…’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘बोगस गाणं निवडलंस’. रिंकूच्या या व्हिडीओला जवळपास 266 नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. तर 30 हजारपेक्षा जास्त युझर्सनं या व्हिडीओला लाइक केलं आहे.
https://www.instagram.com/p/Cm3M-y5KDyY/?utm_source=ig_web_copy_link