चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा
जळगाव – एमआयडिसीतील व्ही सेक्टरमध्ये छोटेसे किराणा मालाचे दुकान चालविणाऱ्या विधवा महिला आणि तिच्या मुलीला दुकानात मारहाण करून अश्लील शिवीगाळ आणि स्पर्श करून विनय भंग केलुयाची घटना घडली असून चौगहनविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी कि आज १४ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास निलेश दिलीप पाटील,अक्षय दर्यावसिंग राजपूत ,विशाल भागवत सुरवाडे, आणि राजकिरण मानसिंग परदेशी सर्व राहणार रायपूर कुसुंबा यांनी येत विचारले कि तू नवनाथ यास ओळखते का , मी सांगितले कि मी त्याला ओळखते मात्र त्याच्याशी माझा काही सम्बन्ध नाही असे फिर्यादी महिलेने सांगताच पीडित महिलेला शिवीगाळ करून बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली . तसेच भांडण आवरायला गेलेल्या महिलेच्या मुलीलाही मारहाण करून शिवीगाळ केली . याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.